सोशल मीडियात बदनामी केल्याबाबत फिर्याद नोंदविण्याचा न्यायालयाचा आदेश


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  फेसबुकवर वायरमन-वायरमन असे बनावट अकौंट उघडून अज्ञात व्यक्तीने सोशल मिडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याची फिर्याद पोलिसांना नोंदविण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. 

महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या. येथे भाऊसाहेब भाकरे हे नोकरीस असून ते तांत्रिक विज कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. या संघटनेची व श्री. भाकरे यांची बदनामी करण्याच्या दृष्टीने अज्ञात व्यक्तींनी फेसबुकवर वायरमन-वायरमन नावाचे अकौंट उघडले व सदरहू अकौटवरुन महाराष्ट्रातील अनेक विज तांत्रिक कर्मचाऱ्यांना समाविष्ट करुन घेतले. 


Loading...
या बनावट अकौटच्या माध्यमातून भाकरे व संघटना यांची बदनामी होईल अशा प्रकारचे मजकूर असलेल्या बदनामीकारक पोस्ट टाकल्या. सदरहू पोस्ट टाकतांना इडीट केल्या गेल्या व सर्व बदनामीकारक खोट्या मजकुराच्या पोस्ट फेसबूक अकौंटवर जॉइन करुन घेतलेल्या लोकांना टॅग केले. त्यामुळे भाकरे यांची खोट्या व बदनामीकारक पोस्टच्या माध्यमातून स्वत:ची ओळख लपवून अज्ञात व्यक्तींनी बदनामी केली. 

त्यामुळे भाकरे यांना प्रचंड मानसिक, शारीरिक त्रास झाला. त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली असता फक्त एन.सी. नोंदवून घेतल्यामुळे श्री. भाकरे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाने सदरहू फिर्यादीची दखल घेऊन कोतवाली पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) प्रमाणे तपास करण्याचे आदेश केले व त्याचा अहवाल न्यायालयास कळविण्याबाबत आदेश केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.