पतंजलीचे दुग्ध व्यवसायात पाऊल,बाटलीबंद पाणी,दही, पनीर, चीज, लोणीही विकणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  आयुर्वेदिक उत्पादन श्रृखंलेच्या माध्यमातून बाजारात दबदबा निर्माण करणाऱ्या योगगुरू रामदेव बाबांच्या पतंजली समूहाने आता दुग्ध व्यवसायातही पाऊल ठेवले आहे. याशिवाय बाटलीबंद पाण्याचीही विक्री पतंजलीकडून केली जाणार आहे. योगगुरू रामदेव बाबांनी पतंजली उद्योग समूहाच्या या नव्या व्यावसायिक श्रृंखलांची घोषणा केली. 

Loading...
चालू आर्थिक वर्षात ५०० कोटींचा व्यवसाय केला जाईल. दररोज १० लाख लिटर दूध विक्रीचे लक्ष्य समोर ठेवून वाटचाल केली जात आहे, असे रामदेव बाबांनी सांगितले. नियमित पॅकिंगशिवाय टेट्रा पॅकिंगमधूनही दूध उत्पादने सादर केली जातील. इतर ब्रँडच्या तुलनेत पतंजलीचे दूध २ रुपयांनी स्वस्त, असेल असेही त्यांनी सांगितले. 

याशिवाय बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायातही पतंजलीने पाऊल ठेवले . आहे. 'दिव्य जल' या नावाने पतंजलीचे बाटलीबंद पाणी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. तर काही सौर उत्पादनेही पतंजलीने सुरू केली आहेत. यात सौर पॅनलचा समावेश आहे. येत्या दिवाळीपासून पतंजली वस्रोद्योगातही पाऊल ठेवणार आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.