नगर-मनमाड मार्गावर वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर-मनमाड मार्गावरिल हॉटेल सर्जाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. मयत दोघे राहुरी कारखाना येथील तरुण असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Loading...
योगेश आबासाहेब गवांदे (वय २८,रा. कराळेवाडी, राहुरी फॅक्टरी) व पांडुरंग भागवत तुपे (वय २७, रा.अंबिकानगर, राहुरी फॅक्टरी) हे दोघे एका दुचाकीवरुन जात असताना पाठीमागून आलेल्या वाहनाने या दोघांना उडवले. 

या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी दुपारी राहुरी येथे शवविच्छेदन केंद्रावर जमलेल्या नातेवाईकांनी दोघा तरूणांचे मृतदेह पाहून हंबरडा फोडला. मयत योगेश हा चैतन्य मिलचे डीलर यशंवत फोफसे यांच्या दूध वाहक वाहनावर चालक म्हणून काम करत होता. 


दरम्यान पांडुरंग तुपे याच्यावर दुपारी २ वाजता तर सायंकाळी ४ वाजता योगेश गवांदे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अपघात समयी दीपक त्रिभुवन, सुनील सोनवणे, हर्षद ताथेड, योगेश आंबेडकर, शांती चौक मित्रमंडळ सदस्य व कराळेवाडी परिसरातील नागरिकांनी मदत केली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.