श्रीगोंदा तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे पाच एकर ऊस जळून खाक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तालुक्यातील आढळगाव येथील दादा शंकर गव्हाणे यांचा आज (१२) दुपारी विजेच्या तारांचे शॉर्ट सर्किट झाल्याने पाच एकर ऊस जळून खाक झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, तांदळी दुमाला शिवारात दादा गव्हाणे यांच्या मालकीचा ऊस आहे. 

Loading...
या क्षेत्रातून महावितरण कंपनीची वाहिनी गेलेली आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास तारांचे घर्षण होऊन विजेचे लोळ उसाच्या क्षेत्रावर पडले. क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आज़ऊबाज़ूच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अध्र्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. 

ही आग विझविण्यासाठी नानासाहेब गव्हाणे, शैलेश गव्हाणे, बाबा गव्हाणे, बाळासाहेब गव्हाणे, यांच्यासह शेतकऱ्यांनी मदत केली. दरम्यान, या ठिकाणी गेल्या आठवडाभरापासून आगीचे गोळे पडत होते, याबाबत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. मात्र, त्याची वेळीच दखल घेतली न गेल्याने आजची दुर्घटना घडली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.