राठोड, जगतापसह छिंदमसह तीनशे जणांना शहरबंदी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोहरम आणि गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून गुन्हे असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेचे नगरसेवक विक्रम अनिल राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन अरुण जगताप, माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमसह सुमारे तीनशे जणांना उत्सव काळात शहरबंदी लागू करण्यात आली आहे. १३ ते २३ सप्टेंबर या कालावधीत या सर्वांना शहरबाहेर रहावे लागणार आहे. नगरच्या प्रांतधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी हे आदेश दिले आहेत.
Loading...

नगर शहराच्या हद्दीत सार्वजनिक शांतता रहावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन नये म्हणून उपद्रवी, गुन्हे दाखल असलेल्यांविरुद्ध कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प या तीन पोलिस स्टेशनने प्रांतधिकारी कार्यालयात कलम १४४ (२) नुसार अहवाल सादर केले होते.


तब्बल तीनशेहून अधिक जणांविरुद्ध असे अहवाल सादर करण्यात आले होते. त्यात विक्रम राठोड, सचिन अरुण जगताप यांच्यासह शिवसेनेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते यांचा समावेश होता. तर काही रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश होता. 

यांच्यावर झाली शहरबंदीची कारवाई. 
बिरजू राजू जाधव, जावेद बिलाल शेख, विशाल बबन हुच्चे, सचिन महादेव शिंदे, नंदूर लक्ष्मण बोराटे, सुरज सुभाष जाधव, करण कैलास ससे, टकलू मुक्तार शेख, अनेक गुन्हे असलेला अझहर मंजूर शेख, संतोष लहानू सूर्यवंशी, परेश चंद्रकांत खराडे, शिवाजी बाबूराव अनभुले, निखिल बाळकृष्ण हंगेकर, गजेंद्र प्रकाश सैंदर, दिनेश सैंदर, रशिद अब्दूल ऊर्फ अजिज शेख ऊर्फ दंडा, घनश्याम बोडखे, सचिन चंद्रकांत शिंदे, अशोक शामराव दहिफळे, विजय मोहन पटारे, करण ऊर्फ बंदी हापसे, बंटी अशोक राऊत, अंकुश चत्तर, मोसीन शकील शेख यांच्यासह तीनशे जणांवर शहरबंदीची कारवाई झाली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.