शेवगाव तालुक्यातील बाळासाहेब फलके यांना वीर मरण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यातील फलकेवाडीचे सुपुत्र बाळासाहेब भाऊराव फलके (वय ४६) वर्षे यांना मंगळवार, दि. ११ रोजी सकाळी १०.३० वा. आकस्मित निधन झाले. तलोजा, ता. पनवेल, जिल्हा रायगड येथे रॅपीड ॲक्शन फोर्स (आरएएफ) मध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. 


Loading...
त्यांचा मृतदेह शासकीय वाहनाने आज बुधवार, दि.१२ रोजी सकाळी ९ वा. त्यांच्या जन्मगावी फलकेवाडी येथे आणण्यात आला. त्यानंतर स्मशानभूमीत त्यांना पुष्पचक्र वाहून व मानवंदना देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

याप्रसंगी १०२ बटालियन आरएएफ नवीन मुंबई येथील सबइन्स्पेक्टर आर. इ. पाटील, हवलदार बी. बी. पवार, व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. शेवगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक भारत काळे, पोकॉ. संदीप ढाकणे, सचिन खेडकर, नामदेव पवार व गावातील मोठा ज़नसमुदाय उपस्थित होता. 


शहीद बाळासाहेब फलके यांच्यापश्चात पत्नी गीताताई, मुलगा निशांत, मुलगी कोमल, एक बंधू व चार बहिणी, असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शेवगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.