सावकाराचे पैसे देऊनही जमीन न दिल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- व्याजाने दिलेली रक्कम व्याजासह परत करूनही जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याने नेवासे तालुक्यातील पिंपरी शहाली येथील शेतकरी अशोक भालकर यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Loading...
याप्रकरणी सुनिता अशोक भालकर यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की पती अशोक यांना शेतीच्या कामासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी लोकांकडून हातउसने पैसे घेतले होते. ते परत द्यायचे असल्यामुळे त्यांनी शेवगाव तालुक्यातील दहिगाव येथील सावकार श्रीपती आढाव याच्याकडून पाच लाख पाच हजार रुपये व्याजाने पैसे घेतले होते.त्याबदल्यात साडेतीन एकर शेतजमीन त्याच्या पत्नीच्या नावावर केली होती. हे पैसे तीन टक्के व्याजासह परत दिल्यावर जमीन पुन्हा नावावर करून देणार असे ठरले होते. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.