पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलिसाविरुध्द गुन्हा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यातील कर्मचारी आकाश अनिल भैरट याच्याविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, एका तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल आकाश भैरट याच्याविरुद्ध लाच मागणीची तक्रार नोंदविली होती.


Loading...
त्यानुसार दि.२४ ऑगस्ट रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये तक्रारदार यांच्या मुलीचे मोबाईल संबंधाने प्राप्त तक्रारी प्रकरणात भविष्यात तिला अडचण येऊ नये म्हणून प्रकरण मिटविल्याने व त्यासाठी सहकार्य केल्याच्या मोबदल्यात आकाश भैरट याने आपल्या पदाचा दुरुपयोग करुन स्वत:च्या फायद्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पंच साक्षीदारासमक्ष ५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.