स्वाईन फ्लूसदृश आजाराने एकाचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील लाडगाव येथील शंकर मारुती भांड यांचा स्वाईनफ्लूसदृश आजाराने काल मृत्यू झाला. काही दिवसांपासून ते आजारी होते.भांड हे काही दिवसांपासून थंडी, तापाने आजारी होते. 


Loading...
त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रविवारी श्रीरामपूरातील मोठ्या खासगी रुग्णालयात व तेथून अहमदनगर येथील विळद घाटातील रुग्णालयात भरती करण्यात आले.तेथे त्यांचा मृत्यू झाला. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमुने लाडगाव येथे भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांची तपासणी केली व त्यांना टॅमीफ्लूच्या गोळ्या सुरू केल्या. त्यांच्या रक्ताचे नमुनेही घेतले जाणार आहेत.भांड हे अशोकचे माजी कर्मचारी व लाडगाव सोसायटीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुलं, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. नरेंद्र व अतूल भांड यांचे ते वडील होत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.