चोरीचे सोने घेतल्याप्रकरणी सराफाला अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी शहरातील एका सराफास श्रीरामपूर शहर पोलिसांनी काल अटक केली. सचिन महाले असे या सराफाचे नाव आहे..


Loading...
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. १६ ऑगस्ट रोजी रात्री अशोक नूरसय्या इराबती (रा. ईराबती सदन, दत्त मंदिराजवळ, वॉर्ड क्रमांक ३) यांच्या घराचे कुलूप तोडून सुमारे सव्वादोन लाख रुपयांची चोरी झाली होती. तपासादरम्यान सलिम आयूब शेख (वय २१, रा. वॉर्ड क्रमांक २) यास व त्याचा साथीदार विशाल नितीन आवारे (रा. श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी या चोरीतील सोने घेतल्यावरून सचिन महाले या सराफास काल पोलिसांनी अटक केली आहे.


----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.