खा. मुंडेंची बदनामी करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजपाच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांच्याबाबत फेसबुकवर मज़कूर टाकणाऱ्या माध्यमिक शिक्षकावर गुन्हा नोंदवावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी दिला आहे. पुणे (निगडी) येथील एका माध्यमिक शिक्षकाने फेसबुकवर भाजपा खा. प्रीमत मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मज़कूर टाकल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली. 


Loading...
या वेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांना निवेदन देण्यात आले. सोमवारी पाथर्डी येथे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, संदीप घुले, हरिओम दहिफळे, शुभम येळाई, वसीम शेख, अर्जुन धायतडक, नीलेश दराडे, महादेव दहिफळे, गोकुळ दौंड, तुकाराम बांगर यांनी पोलिस ठाण्यात येऊन संजय कुऱ्हाडे या माध्यमिक शिक्षकावर सायबर नियमाप्रमाणे गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून पुणे येथे गुन्हा नोंदविला आहे, काय याची माहिती घेऊन कारवाई करू,असे रत्नपारखी यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.