शेतजमिनीतून वाद; भावास कुऱ्हाडीने मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील मजले चिंचोली येथे शेतीच्या वादातून सख्या भावास कुऱ्हाड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मारहाण केलेल्या भावाच्या फिर्यादीवरून कुटुंबातील चौघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परमेश्वर लक्ष्मण औटी (वय ३२, रा. पालवे वस्ती, मजले चिंचोले, ता. नगर) हे शेतामध्ये कांद्याच्या पिकास पाणी देत असताना त्यांचा भाऊ महादेव लक्ष्मण औटी, कमलेश लक्ष्मण औटी, लक्ष्मण एकनाथ औटी, मंगल महादेव औटी (सर्व रा. पालवे वस्ती, मजले चिंचोले, ता. नगर) यांनी परमेश्वर औटी यांना तू येथून निघून जा, तुला शेती देणार नाही असे म्हणून कुऱ्हाडीने व काठीने मारहाण करून दुखापत केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी परमेश्वर औटी यांच्या फिर्यादीवरून चौघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना. खंडागळे हे करीत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.