आश्वासने देणाऱ्या सरकारचे अच्छे दिन कुठे हरवले? - आ.थोरात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पेट्रोल, गॅस व डिझेलच्या भाववाढीच्या महागाईच्या निषेधार्थ संगामनेर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. खोटी आश्­वासने देणाऱ्या सरकारचे अच्छे दिन कुठे हरवले? असा सवाल करून महागाईने सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले असून जनता सरकारला वैतागली असल्याची टिका काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

Loading...
संगमनेरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी मित्रपक्षांच्या वतीने महागाईच्या निषेध मोर्चात आ. थोरात बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शहराध्यक्ष विश्­वास मूर्तडक, दिलीप शिंदे, सभापती निशाताई कोकणे, अर्चनाताई बालोडे, नवनाथ अरगडे, भाऊसाहेब कुटे, आर. एम. कातोरे, केशव मुर्तडक, मिलींद कानवडे, किशोर टोकसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, भुलथापा देऊन सत्तेवर आलेले हे भाजप सरकार असून आता त्यांचे अच्छे दिन हरवले का? नोटाबंदी व जीएसटीच्या आत्मघातकी निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. सरकार दररोज पेट्रोल, डिझेलची दरवाढ करत आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वत्र महागाई वाढली आहे. यात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. पुन्हा विकासासाठी व शेतकरी, गोरगरिब व सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.