भारत बंद म्हणजे निवडणुका जवळ आल्याचे संकेत : अण्णा हजारे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- इंधन दरवाढीवर काँग्रेस पक्षाने 'भारत बंद' पुकारला आहे. मात्र, काँग्रेस-भाजपदरम्यान जे आरोप प्रत्यारोप चाललेत, ते निवडणुका जवळ आल्याचे संकेत असल्याचा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लगावला आहे. या वेळी अण्णा हजारे यांनी इंधन दरवाढीचा प्रश्न गंभीर असून, त्याचा सर्वसामान्य माणसाला त्रास होत असल्याचे म्हटले आहे. 

Loading...
दुचाकी वाहने ही सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगाराच्या निकडीची बाब आहे. त्यामुळे इंधनवाढीचा त्रास हा उद्योगपतींना नव्हे, तर सामान्य जनतेला बसत असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे. याबाबत सरकारच्या धोरणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर इंधनाचे दर वाढले असताना इतर वस्तूंप्रमाणे इंधनाला ज़ीएसटीमध्ये का घेतले नाही, असाही प्रश्न उपस्थित केला. यामागे पैशाकडे केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जात असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.