वकील बापाने केला वकील मुलावर व विधवा सुनेवर पोटगीचा दावा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- म्हातारपणामुळे व आजारपणामुळे वकिली व्यवसाय करणे अशक्य झाल्यामुळे व त्यातच औषधोपचारा साठीही वकिल मुलाने पैसे देण्यास नकार दिल्याने वृद्ध वकिल पित्यावर त्याचे स्वत:साठी व पत्नीसाठी कोर्टात क्रि प्रो कोड कलम १२५ प्रमाणे वकिल मुलावर व दुसरा वकिल मुलगा मयत झालेला असल्याने त्याचे विधवा पत्नीवर पोटगीची केस दाखल करण्याची वेळ आली आहे.
Loading...

याबाबतची माहिती अशी की, ॲड. सुरेश बजरंग झरेकर यांनी त्यांचे स्वत:साठी व त्यांची पत्नी सौ. पुष्पलता सुरेश झरेकर हिच्यासाठी क्रि. प्रो. कोड कलम १२५, अन्वये अन्न वस्त्र पोटगी दरमहा प्रत्येकी रक्कम रुपये ३०,०००/- मिळणेसाठी अहमदनगर येथील फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली. 


आपला मुलगा मिलिंद सुरेश झरेकर हा वकिल असून दि. २२/७/२०१८ रोजी त्यांनी औषधोपचारासाठी लागणाऱ्या रक्कमेची मागणी केली असता ती देण्यास नकार दिला म्हणून त्यांचे विरुद्ध तसेच त्यांचा दुसरा मुलगा मयत अजित सुरेश झरेकर याची पत्नीही कोर्टात वकिलीचा व्यवसाय करीत असल्याने तीच्या विरुद्ध कोर्टात पोटगीचा दावा दाखल केला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी दि. १२ सप्टेंबरला होणार आहे
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.