सावकाराच्या जाचाला कंटाळून पाथर्डीत एकाची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खासगी सावकराचे कर्ज व खोटया गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याने येथील बोरुडे वस्तीवरील रमेश अरुण बोरुडे (वय-३७ वर्षे) यांनी गळफास घेऊन रविवारी राहत्या घरात आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.रमेश अरुण बोरुडे हे गवंडी काम करीत होते.

Loading...
त्यांच्याकडे अनेकांचे कर्जाचे व हातउसणे पैसे होते. शनिवारी (ता.८) सकाळी विकास मासाळकर (वय ४० वर्षे) हे बोरुडे यांच्या घरी आले व म्हणाले, तीन महिन्यांपूर्वी घेतलेले सात हजार रुपये परत दे, जोपर्यंत पैसे देत नाही, तोपर्यंत तुझी मोटारसायकल माझ्याकडे राहील, असे सांगून बोरुडे यांची मोटारसायकल घेऊन गेला. 

त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता कसबा पेठेतील श्रीकांत लक्ष्मण काळोखे व त्यांची बहीण बोरुडे यांच्या वस्तीवर आले व म्हणाले, आम्ही उसणे दिलेले पाच हजार रुपये उद्या सकाळपर्यंत दिले नाही तर तुला खोटया गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी दिली. त्यामुळे कर्जाचे पैसे व बदनामीच्या धमकीला घाबरून रमेश बोरुडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद मीरा रमेश बोरुडे यांनी रविवारी रात्री दिली. 

पोलिसांनी विकास मासाळकर, रा. डांगेवाडी व श्रीकांत काळोखे, रेखा काळोखे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. रमेश बोरुडे यांच्या मृतदेहाचे पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. व सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.