मराठा आरक्षणासाठी ११ वीच्या विद्यार्थीनीची गळफास घेत आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा आरक्षणासाठी ११ वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१०) दुपारी राधाबाई महिला महाविद्यालयात घडली असून किशोरी बबन काकडे (वय १६ रा. कापूरवाडी, ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान असे किशोरीने मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. महाविद्यालल परिसरातील विद्यार्थीनी वस्तीगृहाच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. 


Loading...
हा प्रकार इतर विद्यार्थीनींच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत प्राचार्यांना माहिती दिली. प्राचार्य दिनकर पाटील यांच्यासह इतर प्राध्यापकांनी तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वस्तीगृहाच्या खोलीत लोखंडी फॅनला दोरीने गळफास घेत किशोरीने आपले जीवन संपवले. 

मराठा आरक्षणासाठी बलिदान देत असल्याची आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केली आहे. या चिठ्ठीत किशोरीने म्हटले आहे की, मला दहावित ८९ टक्के गुण मिळूनही अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला नाही. चांगले गुण असूनही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घ्यावा लागला. 

याउलट ७६ टक्के गुण असलेल्यांना केवळ १ हजार रुपयांमध्ये अनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला. केवळ मराठा समाजात जन्माला आल्याने ही वेळ आली आहे. मराठयांचा महाराष्ट्र असूनही मराठयांवर ही वेळ आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी बलिदान देत आहे, असे चिठ्ठीत लिहीले आहे. आपण आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नसल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.