पालकमंत्री राम शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले पालकमंत्री राम शिंदे यांच्या स्वत:च्या मतदारसंघातील नगरपरिषदेवर प्रभारी मुख्याधिकारी आहे. आज अखेर १६ मुख्याधिकारी या नगरपरिषदेच्या अडीच वर्षांच्या काळात झाले. हे त्यांचे अपयश आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली आहे.
Loading...

नगरसेवक दिगंबर चव्हाण हे नगरपरिषदेचे निकृष्ट कामे व इतर मागण्यांसाठी नगरपरिषदेसमोर उपोषणास बसले, या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी उपोषणास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.मधुकर राळेभात, माजी जि.प.सदस्य शाहाजी राळेभात, नगरसेवक पवनराजे राळेभात, शिवसंग्रामचे जिल्हाअध्यक्ष अमजद पठाण, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष जमीर सय्यद, अवधूत पवार, संभाजी राळेभात आदी उपस्थित होते. 

यावेळी फाळके म्हणाले, नगरसेवक दिगंबर चव्हाण एकटे नाहीत. तर संपूर्ण राष्ट्रवादी त्यांच्या पाठीशी आहे. तालुका प्रशासनाने लक्ष दिले नाही, तर आजच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना उपोषणाची सद्य स्थिती सांगणार आहे. त्यांना न्याय मिळाला नाही, तर वेळप्रसंगी रस्त्यावर येऊन हातात रुमणे घेऊ व यापुढील जबाबदारी प्रशासनाची राहील असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.