बुऱ्हाणनगरमध्ये महिलेचा मृत्यू,घातपाताचा नातेवाईकांचा संशय.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर जवळील बुऱ्हाणनगर रस्त्यावर एका धार्मिक स्थळाजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून या घटनेबाबत महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. ही घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारी घडली. 

घटनास्थळाजवळील शेतात रक्ताचे डाग आढळल्याने तेथे मोठी गर्दी जमा झाली होती.तेथे सापडलेले रक्ताचे डाग हे महिलेचे व एका जनावराचे असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे स.पो.नि. संदीप पाटील यांनी दिली असून हा अपघात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच अपघात झाल्याचे काही जणांनी पाहिल्याचे पोलिसांना सांगितले. 
Loading...

या प्रकरणाचा योग्य तो तपास सुरु असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुऱ्हाणनगर रोडवरील एका धार्मिक स्थळाजवळ अपघात झाला असून एक ४० वर्षीय महिला जखमी झाल्याची माहिती कॅम्प पोलिसांना मिळाली. 

त्यानूसार कॅम्प पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेस एका इसमाने उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केले होते. जखमी महिलेचे नाव वर्षा उमेश साठे (वय ४०, रा. निंबोडी) असे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी महिला जखमी अवस्थेत आढळली त्या जागेपासून थोड्या अंतरावर शेत जमिनीत काही रक्त पडल्याचे आढळून आले. यावरून मयत महिलेच्या मृत्यु मागे काहीतरी घातपात झाला असल्याचा संशय महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केला. 

याबाबत पोलिसांनी घटनास्थळाची कसून पाहणी केली. फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळाहून रक्ताचे नमुने घेवून ते प्रयोग शाळेत तपासले असता ते रक्त महिलेचे व एका जनावराचे असल्याचे समोर आले आहे. ही घटना अपघात असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून काही प्रत्यक्षदर्शीनी अपघात घडल्याचे पाहिले असल्याचे पोलिसांनी सांगून नातेवाईकांच्या भावना समजून योग्य पध्दतीने तपास सुरु असल्याचे सांगितले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.