जीप झाडाला धडकल्याने ११ जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील राजूरजवळ माळेगाव खांडीत जीप ब्रेक फेल होऊन रस्त्याच्या कडेला झाडाला धडकली. त्यामध्ये ११ जण जखमी झाले. त्यांच्यावर राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असून गंभीर जखमींना अकोले येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

Loading...
राजूर येथून शेणीत येथे जाण्यासाठी जीप क्र. एमएच ४४ - ३९८८ ही जवळपास २५ ते ३० प्रवासी घेऊन निघाली होती. पोळ्याची सुट्टी असल्याने विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. शेवटची गाडी असल्याने जीपच्या टपावरही अनेक प्रवासी बसलेले होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गाडी माळेगाव खांडीत उताराला आली असता गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात झाडावर आदळली. 

यावेळी अकोलेचे तहसीलदार यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना राजुर ग्रामीण रुग्णालयात हलविले. सखुबाई निवृत्ती धोंगडे (वय- ६२, रा. शेणीत), नवनाथ गोगा धोंगडे (वय-३२, रा. लाडगांव), वंदना ज्ञानेश्वर झांबाडे (वय-४०, रा. लाडगाव), विकास त्र्यंबक धोंगडे (वय-२६, रा. शेणीत), संदेश बाळु मुठे (वय-१७, रा. लाडगाव), रोहिदास नामदेव घाणे (वय-३३, रा. वारंघुशी), अमोल निवृत्ती धोंगडे (वय-२१, रा. शेणीत) या जखमींवर राजूर येथे उपचार सुरु आहेत, तर अकोले येथील रुग्णालयात सपना संपत खेताडे (वय-२३, रा. साम्रद), निवृत्ती भिवा धोंगडे (वय- ६८, रा. शेणीत), दर्शन नामदेव भांगरे (वय-१३, रा. शेणीत), हिराबाई किसन घाटकर (वय-७०, रा. शेणीत) यांच्यावर उपचार सुरु आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.