आ.मुरकुटे यांच्याबाबत प्रशांत गडाख यांच्या मनाचा मोठेपणा नेवाश्यात चर्चेत !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने विकासासाठी दत्तक घेतलेल्या मोरया चिंचोरेतील कामाचा प्रारंभ आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते झाल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला. गडाख-मुरकुटेंचा हा एकत्रित कार्यक्रम धक्कादायक ठरणार आहे.
Loading...

आदर्शग्राम योजनेंतर्गत यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने मोरया चिंचोरे हे अवर्षणग्रस्त गाव दत्तक घेतले आहे. अध्यक्ष गडाख यांनी ग्रामस्थांना एकत्र करून गावाचा चेहरामोहरा बदलला. माथा ते पायथा डोंगरांवर समतल चर, बांधबंदिस्ती, गावाच्या चहुबाजुने रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था, सर्व घरांना एकच रंग, साखळी बंधारे, सुसज्ज यशवंत वाचनालय, वन्यप्राण्यांसाठी पाणवठे आदी कामे करण्यात आली. 


भाऊराव महाराज पोटे समाधीस्थळ गावकरी व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे स्थळ सुशोभित करण्यासाठी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्यात आला आहे. सभामंडप व मुख्य प्रवेशद्वार अशी साडेसात लाखांची कामे पूर्ण झाली आहेत. रविवारी सप्ताह सांगतेप्रसंगी कारंजे, समाधीस्थळी पेव्हिंग ब्लॉक, नदीपात्र अस्तरीकरण या कामांचा प्रारंभ करण्यात आला. 


याप्रसंगी प्रशांत गडाख, आमदार मुरकुटे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, अर्जुन दराडे, रामकृष्ण महाराज वीर, कारभारी महाराज झरेकर, पुंडलिक महाराज मोरे, विष्णू महाराज पिठोरे आदींसह मोरयाचिंचोरे, लोहोगाव, वांजोळी, घोडेगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


प्रशांत गडाख यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राजकीय विरोधक असलेल्या भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या हस्ते भूमिपूजन केले. गडाख यांनी सुसंस्कृतपणा दाखवून केलेल्या या कृतीची कार्यक्रमस्थळी चर्चा झाली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.