तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एक ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील कोल्हार येथील नवीन पुलालगत दोन मोटारसायकल व ट्रकच्या विचित्र अपघातात ट्रकच्या पुढील चाकाखाली येऊन बाळासाहेब माधव काळे (वय-३०, रा. वडगावपान, ता. संगमनेर) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र व आणखी एक वाहनचालक गंभीर जखमी झाला. 

Loading...
सदर घटना काल दुपारी साडेतीच्या सुमारास नवीन पुलालगत घडली.. याबाबत माहिती अशी की, दुपारी साडेतीनच्या सुमारास कोल्हार येथील नवीन पुलावरून नगरहुन कोल्हारकडे जात असलेली मोटारसायकल (क्र.एमएच १७ एआर ९६९) ची बाभळेश्वरहुन नगरकडे जाणाऱ्या मोटारसायकलला (क्र.एमएच १७ बीई ५६३८) या जोरदार धडक बसल्याचे समजते. 

धडकेनंतर मोटसायकलस्वार समोरून येणाऱ्या ट्रकच्या (क्र. टी एन-२८ पी-१४४४) पुढच्या चाकाखाली फेकला गेल्याने मोटारसायकलस्वार बाळासाहेब माधव काळे हा जागीच ठार झाला. तर मागील बाजूस बसलेला त्याचा सहकारी सोमनाथ काळे उडून बाजूला पडल्याने बचावला. दरम्यान दोन्ही मोटारसायकलच्या धडकेत भारत मेहेत्रे (रा. राऊतवाडी ता. राहुरी) हा गंभीर जखमी झाला.

त्यास तातडीने रुग्णवाहिकेतून नगरकडे हलविण्यात आले. . अपघातात जागेवर ठार झालेले बाळासाहेब काळे यांना रुग्णवाहिकेतून प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान तिन्ही वाहनाच्या धडकेनंतर मोठा आवाज झाल्याने जवळच राहत असणारे कोल्हारचे माजी उपसरपंच स्वप्नील निबे घटनास्थळी धावले. 

सोबत आणखी युवकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. घटनेनंतर अवघ्या काही मिनिटात कोल्हारच्या नवीन पुलावर कर्तव्य बजावीत असलेले पो.कॉ.वढणे घटनास्थळी आले. त्यानंतर पो.हे.कॉ. फुलारी व लोणी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. प्रल्हाद पाटील घटनास्थळी दाखल झाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.