भारत बंदच्या पार्श्‍वभुमीवर विरोधी पक्षांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- देशात पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ देण्यात पुकारण्यात आलेल्या भारत बंद च्या पार्श्‍वभुमीवर शहरात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्व विरोधी राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Loading...


पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने अवास्तव आणि अन्यायकारक दरवाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आज भारत बंद पुकारण्यात आला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. यामधे व्यापारी वर्ग, सामान्य जनता सहभागी झाली आहे.

सन 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे 110 डॉलर्स प्रती बॅरल होती. तेव्हा मुंबई पेट्रोलचा दर 80 रूपये तर डिझेलचा दर साधारण 64 रूपये प्रती लीटर होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे 80 डॉलर्स प्रती बॅरल म्हणजेच सन 2014 च्या तुलनेत 30 डॉलर्सने कमी आहे.

तरीही आज शहरात पेट्रोलचे दर 88.23 रूपये आणि डिझेलचे दर 76.96 रूपये एवढे आहेत. सरकार इंधनावर कर आणि अधिभार लावून सर्वसामान्य जनतेची लूट करीत असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. इंधनदरवाढीमुळे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने तात्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे व सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. 

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना देण्यात आले. शहरात मोहरम व गणेशोत्सवाची पार्श्‍वभुमी तर जनता, व्यापारी बांधव व सार्वजनिक मालमत्तेचे या आंदोलनाने नुकसान होणार नसल्याची दक्षता घेण्यात आली असून, केंद्र सरकारचा निषेधार्थ हे आंदोलन असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

या आंदोलनात आ.संग्राम जगताप, विनायक देशमुख, अण्णासाहेब शेलार, प्रा.माणिक विधाते, दीप चव्हाण, उबेद शेख, संजय झिंजे, अभिषेक कळमकर, संजय सपकाळ, बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब भंडारी, गौरव ढोणे, निखील वारे, रॉबीन साळवे, सचिन डफळ, अ‍ॅड.आर.आर. पिल्ले, अशोक गायकवाड, साहेबान जहागीरदार, सोमनाथ धूत, वसीम सय्यद, समीर पठाण, दादा दरेकर, अ‍ॅड.शारदा लगड, किसनराव लोटके, रेखा जरे, नलिनी गायकवाड, सुनिता बागडे, रजनी ताठे, शारदा वाघमारे आदि सहभागी झाले होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.