सावेडीत तवेरा चारचाकी गाडी चोरीस.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सावेडी उपनगरातील सोनानगर चौक परिसरातून तवेरा ही चारचाकी गाडी चोरून नेल्याची घटना रविवार दि. २ रोजी घडली असून या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सावेडी उपनगरातील सोनानगर चौकातील पायल अपार्टमेंट येथून राकेश सुरजित आहुजा (वय २४) यांची शेवरलेट कंपनीची तवेरा मॉडेलची पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी ही रात्रीच्या दरम्यान अज्ञात चोराने चोरून नेली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. ना. पवार हे करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.