सत्ताधारी शिवसेनेला व आमदारांना नगरच्या विकासाचे काहीही देणे घेणे नाही - खा.दिलीप गांधी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल व्हावा. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहोरात्र काम करत आहेत. विकासाच्या नवनवीन कल्पना राबवून विकास योजना थेट जनतेपर्यंत पोहचवत आहेत. आपल्या नगरलाही ही विकासाची गंगा येत आहे. मात्र महानगरपालिकेच्या माध्यमातून या मंजूर विकासकामांंची १०० टक्के अंमलबजावणी होत नाही. 


Loading...
ज्यांच्या हातात सत्ता आहे. ते सत्ताधारी विकासकामांत खोडा घालत आहेत. १० कोटींच्या कामातही त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्यास यश आले नाही. लवकरच ही विकासकामे सुरु होणार आहेत. शहराच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आमदारांच्या सारसनगर भागातील नागरिक गेले १५ वर्षे पाण्याच्या टँकरवर उपजिविका करत होते. 

पाईपलाईन, पाण्याची टाकीचे काम पूर्ण झाले असूनही केवळ कार्यकर्त्यांचे हात ओले करण्यासाठी पाणी पुरवठा सुरु केला नाही. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करताच टप्प्याटप्प्याने हा पाणी पुरवठा सुरु झाला आहे. सत्ताधारी शिवसेनेला व आमदारांना नगरच्या विकासाचे काहीही देणे घेणे नाही, केवळ 'मला काय' व श्रेयाकरीताच यांचा खटाटोप असल्याची टीका खासदार दिलीप गांधी यांनी केली. 


राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका आशा कराळे, पै.शिवाजी कराळे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करत भारतीय जनता पार्टीमध्ये खा.दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. यानिमित्त भिस्तबाग चौकात आयोजित सभेत खा.गांधी बोलत होते. 


यावेळी भाजपाचे शहर उपाध्यक्ष किशोर डागवाले, मनपा गटनेते सुवेंद्र गांधी, सभापती बाबासाहेब वाकळे, सरचिटणीस किशोर बोरा, नरेंद्र कुलकर्णी, गौतम दीक्षित, श्रीकांत साठे, महिला आघाडीच्या अध्यक्षा गीतांजली काळे, संगीता खरमाळे, मनिषा काळे, मनोज दुलम, भैय्या गंधे, महेश तवले, अन्वर खान, चेतन जग्गी, नितीन शेलार, किशोर वाकळे, गजानन कराळे, महेश कराळे, श्रीनिवास कराळे, करण कराळे, तायगा शिंदे आदिंसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.