पाथर्डीत वीजवाहक तार अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- म्हशीचे दूध काढताना गावातील वीजवाहक तार अंगावर पडल्याने सोन्याबापू अर्जुन कावळे (वय-२२ वर्षे) आणि म्हैस दोघांचाही विजेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला. लांडकवाडी गावात रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 


Loading...
रविवारी सकाळी सात वाजता सोन्याबापू कावळे हे घराच्या समोर अंगणात बांधलेल्या म्हशीचे दूध काढत असताना वीजवाहक तार तुटून त्यांच्या व म्हशीच्या अंगावर पडली. या वेळी सोन्याबापूने आरडाओरड केला. या वेळी वीजरोहित्र बंद करण्यात आले. 

मात्र, विजेचा ज़ोरदार धक्का बसल्याने सोन्याबापू व म्हशीचा मृत्यू झाला. सोन्याबापूचे वडील अर्जुन कावळे यांनी सोन्याबापूला वाचविण्याचा प्रयत्न केला. यात तेही जखमी झाले. सोन्याबापू हे उसतोड मजूर आहेत. पाथर्डीच्या उप जिल्हारुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. 


माजी जि.प. सदस्य अर्जुन शिरसाट, पंचायत समितीचे सदस्य सुनील ओव्हळ व ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी तक्रार दाखल करून घेतली. 


मयताच्या कुंटुबीयांना महावितरण कंपनीकडून आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. येथील वीजवाहक ज़ुन्या झाल्या असून, त्या सैल पडल्या होत्या. या भागासाठी गेल्या सहा महिन्यांपासून वायरमन नाही. वीज समस्यांबाबत वीज वितरणकडे तक्रार करूनही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.