देवदैठण येथे साईकृपा कृषी महाविद्यालयाच्या वतीने कृषीदिन साजरा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे साईकृपा कृषी महाविद्यालय, घारगावच्या विद्यार्थीच्या वतीने कृषीदिन साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य कल्याणी लोखंडे,सरपंच जयश्री गुंजाळ,उप सरपंच पूजा बनकर, सुरेश लोखंडे, काशिनाथ लोखंडे,तसेच गावतील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली.साईकृपा कृषी महाविद्यालय घारगावचे कृषीदुत सुधीर आगलावे, संदीप मुळे, जगताप चेतन, मनोज बोरुडे,किरण लहांगे, निखिल वैराळ, अक्षय तांबे आदी उपस्थित होते.
Powered by Blogger.