जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : साईकृपा कृषी महाविद्यालय घारगावच्या वतीने जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कृषीदूतांकडून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना योगाचे मार्गदर्शन करण्यात आले.मुलांनी सामूहिक योगासने केली. देवदैठण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी योगदिनाची पार्श्वभूमी, महत्त्व व माहिती मुलांना सांगितली. मुले व उपस्थित शिक्षक यांच्याकडून आसनांचे अनेकविध प्रकार व प्राणायाम करवून घेतले.साईकृपा कृषी महाविद्यालय घारगावचे कृषीदुत सुधीर आगलावे, संदीप मुळे, जगताप चेतन, मनोज बोरुडे,किरण लहांगे, निखिल वैराळ, अक्षय तांबे आदी उपस्थित होते.
Powered by Blogger.