नगरमध्ये चालत्या रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चालत्या रिक्षामध्ये प्रवासी असलेल्या बारावर्षाची अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रकार समोर आला आहे. नगरमधून गणेशोत्सवाचे शनिवारी देखावे पाहून रात्री घराकडे जात असताना हा प्रकार झाला. अन्वर युसूफ पठाण (वय 20, रा. अलमगीर, नागरदेवळे, ता. नगर) या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. 
Loading...

भिंगारच्या वडारवाडीतून ही मुलगी आपल्या आजीबरोबर शनिवारी नगरमध्ये गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी आली होती. देखावे पाहून ही पुन्हा वडारवाडीकडे रात्री नऊ वाजता निघाली होती. माळीवाडा येथील इंपिरीअल चौकातून या मुलीच्या नातेवाइकांनी भिंगारकडे येण्यासाठी रिक्षा केली होती. 


चालकाने काही अंतर पुढे गेल्यावर एका युवकाला प्रवासी म्हणून अन्वर युसूफ पठाण या युवकाला रिक्षात बसविले. अन्वर हा मुलगा पीडित मुलीच्या शेजारीच बसला होता. रिक्षात अंधार असल्याचा फायदा घेत या युवकाने मुलीशी अश्‍लील चाळे सुरू केले. मुलगी या प्रकाराने ती घाबरली.

वडारवाडीत आल्यावर मुलीने रिक्षातून उतरल्याबरोबरच तिच्याशी झालेला प्रकार आजीला सांगितला. रिक्षाचालक पैसे घेऊन काही अंतरावर गेला होता. परंतु आजीने आरडाओरडा केला. आजी ओरडल्याने चालकाने रिक्षा थांबवली. याचवेळी रिक्षातील अन्वर याने तेथून पळ काढला. 

अंधाराचा फायदा घेऊन अन्वर पसार झाला होता. परंतु चालक थांबल्याने आणि आजीच्या आरडाओरडा सुरू केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी रिक्षाभोवती गर्दी केली होती. अश्‍लील चाळ्याचा प्रकार ऐकून जमलेला जमाव चांगलाच संतप्त झाला. तोपर्यंत जमावाची चालकानेच त्या युवकाला पळून लावले, अशी भावना झाली होती. जमावाने ती रिक्षा फोडून टाकली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.