पालकमंत्री राम शिंदेंच्या मतदारसंघात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वाळूतस्करांच्या धाडसामुळे मंत्री ना प्रा.राम शिंदेंच्या मतदारसंघात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र आहे.महसूल कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमबाजी करत वाळूसह जप्त केलेला ट्रॅक्टर चोरून नेण्याची धक्कादायक घटना पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या मतदारसंघात उघडकीस आली आहे. याबाबत सविस्तर असे, कामगार तलाठी शिवाजी हजारे, प्रशांत कांबळे, विकास मोराळे, बाळासाहेब भोगे यांचा समावेश असलेले जामखेड महसूल विभागाचे एक पथक जवळा परिसरात दि.८ रोजी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी रात्री गेले होते. 


Loading...
रात्रभर थांबूनही या परिसरात वाळू वाहतूक करणारी वाहने न आढळल्याने हे पथक पहाटे पाच वाचता जामखेड तहसील कार्यालयात परतले. याच सुमारास आष्टी तालुक्यातील खडकत येथील एक वाळूतस्कर हा आपल्या पाच साथीदारांसह तहसील आवारात येऊन धडकला. 

त्याने कामगार तलाठी कारंडे यांच्या अंगावर धावून जात त्याच्या साथीदारांनी कामगार व तलाठ्यांना शिवीगाळ व दमबाजी करत वाळू भरलेला ट्रॅक्टर घेऊन पोबारा केला. ही घटना दि. ९ रोजी पहाटे पाचच्या सुमारास अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस स्थानकाच्या आवारात घडली. 


या प्रकरणी कामगार तलाठी सुखदेव कारंडे यांच्या फिर्यादीवरून एका वाळूतस्करासह अज्ञात पाच जणांविरोधात जामखेड पोलिसात चार लाख पंचावन्न हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दि.१४ तारखेला दाखल केला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.