राहुरी तालुक्यातील युवकाची चाकूने भोसकून हत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला असून याबाबत चाकण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संक्रापूर येथील शेतकरी बाळासाहेब गुंड यांचा एकुलता एक मुलगा सुयश याने नुकतीच अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली होती. 


Loading...
त्यानंतर तो चाकण येथील एका कंपनीत नोकरीला लागला होता. दि. २९ जुलै रोजी तो पुणे- नाशिक महामार्गावरील धाडगे मळ्यात राहणाऱ्या आपल्या मित्राकडे चालला होता. तसा मित्राला त्याने फोनदेखील केला होता. मित्राचे घर अगदी हाकेच्या अंतरावर असतानाच स्कुटीवर तीन जण आले, सर्वांचे चेहरे रुमालाने झाकलेले होते. 

त्यांनी गाडी आडवी लावून सुयश याची झडती घेतली. त्याचा मोबाईल व पैशाचे पाकिट हिसकावून घेतले व त्यास चाकूने भोसकले. सुयश याने आरडाओरड करताच ते तिघे पळून गेले. त्याच्या मित्राने नागरिकांच्या मदतीने त्यास ससून रुग्णालयात दाखल केले.आठ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर रविवारी त्याचे निधन झाले. संक्रापूर येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.