जामखेडमध्ये तीन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार, पाच जखमी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड परिसरात रात्री तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन ठार तर पाच जखमी झाले आहेत.सविस्तर माहिती अशी की, पहिल्या घटनेत मयत सुरेश बाबासाहेब शिंदे (वय २७, रा.नायगाव) हे जामखेड येथील आपले वेल्डिंगचे दुकान बंद करून सायं ६ वा स्वत:च्या (एम.एच.१६ एक्स ७७५७) या मोटारसायकलवरून आपल्या गावी चालले होते. 

खर्डा रोडवरील बटेवाडी फाट्याजवळ आले असता, समोरून जामखेडकडे येणाऱ्या भरधाव आयशर टॅम्पोची (एमएच १२ एच. डी ३७९५) . मारूती मंदिराजवळ समोरासमोर जोराची धडक झाली. यामध्ये सुरेश शिंदे हा गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला होता व मोटारसायकलचा चक्काचूर झाला होता. सुरेश शिंदे यांना रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Loading...
दुसऱ्या घटनेत रात्री ११.३० वा जामखेड येथील दीपक टेकाळे यांचा बीडरोड ला सौताडा घाटाच्या पायथ्याला अपघात झाला. त्यात टेकाळे गंभीर जखमी झाले त्यांचा जोडीदार किरकोळ जखमी झाला घटनेची माहीती कळताच संजय कोठारी एकटेच आपली रुग्णवाहिका घेऊन पोहचले जखमींना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. 

तिसऱ्या घटना ही रात्री १२ वा (एम.एच १७.बी.वाय.०१९०) हा ट्रक श्रीरामपूर येथुन जामखेड येथील बिस्लरीचे मोकळे बॉक्स घेवून येत असतांना आष्टा फाट्याजवळ आला असता दत्ता सावंत यांच्या मालकीचा उसाने भरलेला डबल ट्रॉलीचा ट्रॅक्टर वाकी (ता.जामखेड) येथुन अहमदनगरला जात असतांना दोन्ही वाहनांची समोरा समोर जोरात धडक होऊन भीषण अपघात झाला. 

या अपघातात ट्रॉक्टरचे दोन टुकडे झाले असून, चाक तुटून पडले व टेम्पो रोडवरच पल्टी झाल्याने रोडवरील वाहतूक तब्बल तीन तास रखडली होती. यावेळी ट्रॅक्टरवर बसलेला अशोक भगवान धावडे ( वय ३०, वाकी ता.जामखेड) हा उसाखाली गाडला गेल्यामुळे त्याचा मुत्यू झाला. 

जमलेल्या प्रवाशांनी व परिसरातील नागरिकांनी तब्बल तीन तासांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्यामध्ये ट्रँक्टर ड्रायव्हर ज्योतीराम दत्तात्रय सावंत (वय ३५) टेम्पो ड्रायव्हर राजू रामकिसन हिवाळे व अजय लिंबाजी शेलार (वय १९ दोघे रा. श्रीरामपूर) हे तिघे जखमी झाले आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.