टिकेकडे दुर्लक्ष करुन आम्‍ही विकास कामे करीतच राहू - शालिनीताई विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राजकीय, सामाजिक वाटचालीत विखे परिवाराने सामान्‍य माणसाशीच बांधिलकी ठेवली. विकासात्‍मक कामांमधून निर्माण केलेल्‍या विश्‍वासामुळेच सामान्‍य माणसांचे आशीर्वाद आम्‍हाला मिळतात, पण ज्‍यांना ही विकासाची प्रक्रिया दिसतच नाही, त्‍यांच्‍याकडून होणाऱ्या टिकेकडे दुर्लक्ष करुन आम्‍ही विकास कामे करीतच राहू, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा ना. सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले. 


Loading...
गोगलगाव येथे लक्ष्‍मीआई देवस्‍थान नवसपूर्ती सोहळ्याचे आयोजन ग्रामस्‍थांच्‍या वतीने करण्‍यात आले होते. या निमित्ताने जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा ना. विखे पाटील यांची शेरणीतुला करण्‍यात आली. ग्रामस्‍थांच्‍या वतीने त्यांचा नागरी सत्‍कारही करण्‍यात आला. या कार्यक्रमाप्रित्‍यर्थ कृतज्ञता व्‍यक्‍त करुन अध्‍यक्षा ना.सौ. विखे पाटील म्‍हणाल्‍या, विखे पाटील परिवाराचा संबंध हा सदैव सामान्‍य माणसांशीच आला. 

पद्मश्रींनी सुरु केलेली ही सामाजिक वाटचाल विकास कामांमधून सर्वांना बरोबर घेवून पुढे जात आहोत. आज राहाता तालुक्‍यात विकासाची सुरु असलेली प्रक्रिया ही सर्वसामान्‍य माणसांना लाभदायक ठरेल अशाच पद्धतीने सुरु असल्‍याचे स्‍पष्‍ट करुन सार्वजनिक कामांबरोबरच वैयक्तिक लाभांच्‍या योजनांची अंमलबजावणी ही पारदर्शकपणे सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 


पद्मभूषण डॉ. खासदार यांनी ग्रामीण विकासाचे रोपटे लावले, त्‍याचा वटवृक्ष करण्‍याचा प्रयत्‍न हा कामातून सुरु असतो. कामातूनच सर्वसामान्‍य माणसाचा विश्‍वास हा विखे पाटील परिवाराने संपादित केला, पण ज्‍यांना हे विकास काम देखवत नाही, त्‍यांच्‍याकडून टिकेचा भडीमार सुरु असला तरी त्‍याकडे दुर्लक्ष करुन आम्‍ही कामे करीतच राहतो. आज राहाता तालुक्‍यातील कोणतेही गाव विकासापासून मागे ठेवलेले नाही. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.