रस्त्यासाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्यातील नान्नज ते बोर्ले शिव रस्ता मोकळा करुन देण्यासाठी नव्वद वर्षीय शेषराव भोरे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तसेच यावेळी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना देलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे. 

Loading...
शिव रस्ता मोकळा करुन देण्यासाठी शेषराव भोरे अनेक वर्षांपासून तहसील कार्यालयात हेलपाटे मारत होते. परंतु माझी कोणीही दखल घेतली नाही, अखेर मी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या शेतजमिनीत जाण्यासाठी मला रस्ता मोकळा नाही. 

त्यामुळे मला माझ्या जमिनीवर आज मला जाता येत नाही. त्यामुळे आज माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मला आत्मदहन केल्या शिवाय पर्याय नाही. माझे व माझ्या कुटुंबाचे जीवाचे जर काही बरेवाईट झाले तर यांची सर्व जबाबदारी शासनावर राहील. 

माजी.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रीमंडळात शेतकऱ्यांना शिव रस्ता मोकळा करुन देण्यासाठी विशेष तरतूद केली होती. मात्र जामखेड येथील शासकीय अधिकारी शिव रस्ता मोकळा करुन देण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे आज आत्मदहन करण्याची वेळ आली असल्याचे मोरे यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.