प्रामाणिकतेमुळे राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली - आ.बाळसाहेब थोरात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत त्यांचा विश्वास सार्थ ठरवला. आजपर्यंत मिळालेल्या मंत्रीपदांच्या माध्यमातून विकास कामे केली. त्यामुळेच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षाचे काम करण्याची संधी मिळाली, हे प्रामाणिक कामाचे फळ आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ.बाळसाहेब थोरात यांनी केले.


Loading...
संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. थोरात साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जि.प. सदस्य आर.एम. कातोरे, शांताबाई खैरे, पं.स. उपसभापती नवनाथ अरगडे, पांडुरंग घुले, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे, माजी सभापती अविनाश सोनवणे, शॅम्प्रोचे उपाध्यक्ष इंजि. सुभाष सांगळे, पं.स. सदस्या स्वाती मोरे, बाळासाहेब मोरे, रमेश गुंजाळ, नानासाहेब शिंदे, बाळासाहेब शिंदे, विलास शिंदे उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले,ऊस दर व दूध दराच्या प्रश्नाबाबत आपण नेहमी शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिलो; परंतु काही शक्ती तालुक्याच्या विकासात खोडा आणण्याचा प्रयत्न करतात. तो प्रयत्न सर्वांनी एकत्र येऊन असफल केला पाहिजे. 


रणजितसिंह देशमुख, माधवराव कानवडे, बाबा ओहोळ यांची भाषणे झाली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीत कायमस्वरूपी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आ. थोरात यांचा सरपंच बाजीराव शिंदे तसेच ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कैलास गाढे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पिंगळे यांनी केले. इंजि. महेश शिंदे यांनी आभार मानले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.