व्हॉट्सअॅपवरून महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्यास अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- व्हॉट्सअॅपवरून महिलांना अश्लील व्हिडिओ, फोटो पाठवून त्रास देणाऱ्या माथेफिरु तरुणाला सायबर पोलिसांनी गजांआड केले. जय दादू चौहाण (वय २३, रा. बंगाल चौकी, नगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
Loading...

हा आरोपी स्वतःच्या मोबाइलच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरून महिलांच्या मोबाइलचा क्रमांक मिळवून त्यांना अश्लील व्हिडिओ, मेसेज, फोटो पाठवून त्यांच्याकडे सेक्स चॅटची मागणी करत होता. याप्रकरणी दोन महिलांनी नगरच्या सायबर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली होती.

त्यानुसार आरोपीविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला माहिती तंत्रज्ञान कायदा, विनयभंग या कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, पोलिस उपनिरीक्षक प्रतीक कोळी इतर कर्मचाऱ्यांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून जय चौहाण याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करून त्याला अटक केली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.