सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाभरात ठिय्या व रास्तारोको आंदोलन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आज गुरूवार दि. ९ रोजी अहमदनगर शहर व संपूर्ण जिल्हाभर ठिय्या व रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन शांततेत होणार असल्याचे समन्वयकांकडून प्रशासनाला सांगण्यात आले आहे. 


मात्र तरीही या आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलिस प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचसोबत सर्वत्र व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे.तसेच ठिकठिकाणी ड्रोन कॅमेऱ्यांव्दारे सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे.यापूर्वीचा अनुभव पाहता एसटी महामंडळाने सर्व एसटी बसेस बंद ठेवण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
Loading...


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी गुरूवारी राज्यभर आंदोलने होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज नगर शहरात देखील मोठे आंदोलन केले जाणार आहे. नगर शहरात सकाही एसटी बसस्थानका पाठीमागील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. 

तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ठिय्या तसेच रास्तारोकोे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या समन्वयकांबरोबर बैठक घेवून आज होणारे आंदोलन शांततेत करावे असे आवाहन केले आहे. 

या आंदोलनात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होवू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे.यासाठी प्रशासनाने सुमारे १५०पोलिस अधिकारी,२ हजार पोलिस कर्मचारी,८०० होमगार्ड तसेच एसआरपीच्या दोन नतुकड्या असा मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.