राहुरीत भर दुपारी चोरट्यांनी ३५ तोळे सोने लांबविले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी येथील तन्मय डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. प्रवीण क्षीरसागर यांच्या घरी भर दुपारी तीन अज्ञात चोरट्यांनी कुलुप तोडून घरातून सुमारे ३० ते ३५ तोळे सोने चोरून नेल्याची घटना घडली.

डॉ.प्रवीण क्षीरसागर हे राहुरी कॉलेज रोड वरील शेटे इस्टेटमधील मध्ये राहत असून त्यांचे तन्मय डायग्नोस्टिक सेंटर हे घरासमोरच आहे. दवाखान्यात रुग्ण आले म्हणून ते घराबाहेर पडले तर त्यांच्या पत्नी पुणे येथे जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. त्यांचा मुलगा शाळेतून घरी आला असता घराचा दरवाजाचा कोंडा तोडून घरात सर्व अस्ताव्यस्त दिसताच त्याने सदर प्रकार तातडीने डॉक्टरांना सांगितला.

Loading...
ते तातडीने घरी आले. त्यांना घरी चोरी झाल्याचे लक्षात आले.चोरट्यांनी घरातील कपाटे उचकुन कपाटातून ३० ते ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरले. बेडरूममधील कपाटाचा दरवाजा तोडून आतील कप्प्यातून सर्व दागिने तसेच दुसऱ्या रूमच्या कपाटातून रोख रक्कम चोरून घेवुन गेले. सदर बिल्डिंगमध्ये ४ जण राहत आहेत. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.