नगर - दौंड रस्त्यावर अपघातात महिलेचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव शिवारात दौंड नगर रस्त्यावर एका ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ठकुबाई विनायक रंधवे वय ५० रा.यवत ता. दौंड ,जि.पुणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती विनायक रंधवे यांना देखील या अपघातात गंभीर दुखापत झाली आह. 

Loading...
सदर अपघाताबाबत मयताचे भाऊ दत्तात्रय लगड र.पांढरेवाडी कोळगाव यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . याबाबत माहिती अशी की, दौंड तालुक्यातील यवत येथील रहिवासी असणारे विनायक रंधवे वय ५५ वर्षे हे सोमवारी सकाळी अकरा वाजता श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील पांढरेवाडी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी त्यांची एम.एच ४२, एव्ही २००४ या दुचाकीवरून त्यांच्या पत्नी ठकुबाई रंधवे यांच्यासोबत जात असताना ते घारगाव शिवारात आले असता. 

दौंड नगर रस्त्यावर पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रक क्र यूपी ९३,बीटी ४७९८ या ट्रकने रंधवे यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ठकुबाई रंधवे यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे त्यात ठकुबाई रंधवे यांचा जागीच मृत्यू झाला. तर विनायक रंधवे हे गंभीर जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी घारगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले अपघात झाल्यानंतर सदर ट्रकचालक ट्रक जागेवरच सोडून पळून गेला. पोलिसांनी सदर ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.