कर्जातून मुक्त होण्यासाठी आरक्षण हाच एकमेव पर्याय - गडाख


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासह धनगर व मुस्लिम समाजाला त्वरित आरक्षण मिळाले पाहिजे, ही आपली भूमिका असून त्याकरिता आपण पक्षीय जोडे बाजूला ठेऊन सदैव समाजाच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. कर्जापायी अनेकांनी याआधी आत्महत्या केल्या. त्यामध्ये बहुजन समाजातील लोकांचे प्रमाण जास्त आहे. कर्जातून मुक्त होण्यासाठी आरक्षण हाच एकमेव पर्याय असल्याचे मत नेवासा तालुक्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केले.


Loading...
 नेवासा येथील श्री खोलेश्वर गणपती चौकात सकल मराठा, मुस्लिम, धनगर समाजास आरक्षण मिळावे म्हणून रविवारपासून भाऊसाहेब वाघ, अनिल ताके, संभाजी माळवदे, युसूफ बागवान, अभिजित मापारी, बाळासाहेब कोकणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी दि. ७ ऑगस्ट रोजी माजी आ. गडाख यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. 

गडाख म्हणाले, आरक्षण मागणे हा आमचा हक्क असून शासनाने यापुढे अधिक अंत न पाहता समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. समाजाच्या या प्रश्नावर आपण नेहमीच गटतट, पक्षभेद विसरून लढाईसाठी सदैव तयार आहे. मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षण प्रश्नावर शासन वेळकाढूपणाची भूमिका घेत असून शासनाच्या नाकर्तेपणावर माजी आ. गडाख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.