गोदड महाराज रथयात्रेत सुजय विखे,राम शिंदेना नो एंट्री !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत तालुक्यातील संत गोदड महाराज रथयात्रेत लोकप्रतिनिधींना बंदी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. ही यात्रा ८ व ९ ऑगस्टला भरत आहे. तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ३० जुलैपासून मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. 

यादरम्यान शहरात संत श्रीगोदड महाराज रथयात्रोत्सव आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व तालुक्याबाहेरील कोणत्याही राजकीय नेत्यांनी यात्रेत सहभागी होऊ नये, असे आवाहन सकल मराठा समाजाने पत्रकाद्वारे केले आहे. ९ रोजी शहरात आंदोलन करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
Loading...

लोकांमध्ये राजकारण्यांविषयी प्रचंड नाराजी आहे. रथयात्रेमध्ये तालुक्याबाहेरील काही लोकप्रतिनिधी व नेते दरवर्षी सहभागी होत असतात. यंदा राजकीय नेते सहभागी झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा संभव आहे. ९ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र चक्का जाम आंदोलन आहे.मात्र, रथोत्सव असल्याने लोकभावनेचा आदर राखत कर्जत शहरात आंदोलन करण्यात येणार नाही, असे समन्वयक नानासाहेब धांडे यांनी स्पष्ट केले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.