व्हॉट्सॲपवरील आक्षेपार्ह मजकुरामुळे शेवगाव तालुक्यात तणाव.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील एका व्यक्तीच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. नागरिकांनी गावातील मुख्य चौकात २ तास रास्ता रोको करत निषेध सभा घेण्यात आली. आरोपीला तत्काळ अटक करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

Loading...
याबाबतची माहिती अशी की, काल बुधवार दि.१ रोजी शहरटाकळी येथील एका व्यक्तीच्या व्हॉट्सॲप ग्रूपवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकला. यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जाऊन त्याचा येथे उद्रेक पाहायला मिळाला. या वेळी गावातील मुख्य चौकात संतप्त जमावाकडून टायर जाळून घोषणाबाजी करण्यात आली. 

सायंकाळी ४ वा. दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गावात सर्व व्यापारी व छोट्या मोठ्या दुकानदारांकडून कडकडीत बंद पाळला. गावातील सर्व व्यवहार बंद झाले होते. या वेळी घटनास्थळी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी उपनिरीक्षकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.या वेळी संतप्त जमावाकडून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.