पंतप्रधान नरेंद्र मोदी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर येण्याची शक्यता


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निवडणुकांचे वेध लागले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्हा दौर्‍याचे नियोजन सुरू आहे. येत्या दि. 23 ला ते जिल्ह्याच्या दौर्‍यावर येतील असे समजते. यंदा शिर्डी येथे होत असलेल्या गंगागीर महाराज अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेला मोदी उपस्थित राहणार आहेत. 

याशिवाय दिवंगत ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रिय मंत्री बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता व्यक्त होते. त्यामुळेच मोदी यांच्या दौर्‍याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 
Loading...
नगर शहरातील एका खासगी उपक्रमाचाही शुभारंभ मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. मोदी यांचा हा दौरा निश्‍चित झाला तर, तो त्यांचा तिसरा व पंतप्रधान म्हणुन दुसरा जिल्हा दौरा ठरेल. 

चार वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार दिलीप गांधी यांच्या प्रचारसभेसाठी मोदी नगरला आले होते. सावेडीतील जॉगिंग टॅकसमोरील खासगी जागेत त्यांची जाहीर सभा जाली होती. त्यानंतर पंतप्रधान झाल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत मोदी जिल्ह्यात आले होते. भाजपचे राहुरी मतदारसंघातील उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी कृषी विद्यापीठाजवळील मैदानावर त्यांची जाहीर सभा झाली होती. 

जिल्ह्याच्या सरहद्दीवरील सराला बेट (वैजापूर) येथील गंगागीर महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे महाराष्टात एक आगळे-वेगळे स्थान आहे. गेली तब्बल 169 वर्षे हा सप्ताह सुरू असून यंदा या सप्ताहाचे शतकोत्तर सत्तरावे वर्ष आहे. 

जिल्ह्याच्या उत्तर भागातील कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, राहुरी, नेवासे या तालुक्यांसह येवला (नाशिक), गंगापूर (औरंगाबाद) या भागात लखोंच्या संख्येने भाविक या सप्ताहात सहभागी होतात. यंदा येत्या दि. 17 ते 23 दरम्यान शिर्डी येथे हा सप्ताह होणार आहे. त्याच्या सांगतेला मोदी उपस्थित राहणार असून पंतप्रधान कार्यालयाने या कार्यक्रमास हिरवा कंदील दिल्याचे समजते. 

हा दौरा निश्‍चित झाला तर, या सप्ताहाला हजेरी लावणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरतील. याबरोबरच कॉंग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशनही या दौर्‍यात मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता व्यक्त होते. त्याकडेच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.