घटस्फोट देत नसल्याच्या रागातून पत्नीच्या भावाला मारहाण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- घटस्फोट देत नसल्याच्या रागातून पत्नीच्या भावाला दगड व लाखेंडी वजनमापाने बेदम मारहाण झाल्याची घटना चौपाटी कारंजा येथे घडली. याप्रकरणी पांडुरंग ज्ञानदेव म्हस्के (रा.श्रध्दाविहार, माऊलीनगर, भगवानबाबा चौक,सावेडी) याच्याविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading...
बालिकाश्रम रोडवरील जाधवमळा येथे राहणारा संकेत जालिंदर जाधव (वय 25) हा सोमवारी (दि.6) दुपारी चौपाटी कारंजा येथे गेला होता. त्यावेळी त्याची भेट मेव्हणा पांडुरंग म्हस्के याच्याशी झाली. बहीण घटस्फोट देत नसल्याच्या कारणातून संकेतला पांडुरंग याने मारहाण करण्यास सुरूवात केली. 

लोखंडी वजनमाप व दगडाने डोक्यात मारून संकेत याला जखमी केले. याप्रकरणी संकेत याने तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंग म्हस्के (वय 29) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक़ विशाल सणस करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.