बसपाचा 11 ऑगस्टला शहरात संविधान बचाव मेळावा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बहुजन समाज पार्टीच्या वतीने शनिवार दि.11 ऑगस्ट रोजी संविधान बचाव जिल्हाव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात दु.12 वा. या जिल्हाव्यापी मेळाव्याचे उद्घाटन होणार असून, या मेळाव्यात बहुजन समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी केले आहे.
Loading...

या मेळाव्यासाठी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अशोक सिध्दार्थ व प्रमोद रैना उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ना.तू. खंदारे, संजीव सदाफुले, प्रदेश महासचिव किरण आल्हाट उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रभारी संजय डहाणे यांनी दिली. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्हा बहुजन समाज पार्टी, शहर कमिटी तसेच सर्व विधानसभा सेक्टर बुथ कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.