आ.बाळासाहेब थोरांतामुळे विकास प्रक्रियेत अडथळे - ना.राधाकृष्ण विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या 26 गावांच्या विकासात आपण कुठेही कमी पडलेलो नाही. विकासाच्या प्रक्रियेतून आपण येथील सर्वसामान्य माणसांमध्ये विश्‍वास निर्माण केला; पण सर्वसामान्य माणसांच्या अडलेल्या कामांत संगमनेरमधल्या माणसांनीच अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ज्यांना हा विकास पाहावत नाही, ते आज फक्‍त व्यक्तिगत टीका करतात, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
Loading...

कोल्हेवाडी येथे दोन हजार शंभर लाभार्थींना मोफत उज्वला गॅस कनेक्‍शनचे वितरण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. अटल विश्‍वकर्मा योजनेत सहभाग घेतलेल्या कामगारांनाही योजनेचे पत्र देण्यात आले. 

विखे म्हणाले, की शिर्डी मतदारसंघात या गावांचा समावेश झाल्यानंतर रस्त्यांच्या कामांना आपण प्राधान्य दिले. गेली अनेक वर्षे ज्या गावात एसटी येत नव्हती, तिथून आज 8 एसटी जात आहेत. या सर्व गावांमध्ये विकासाची प्रक्रिया राबविताना आपण कुठेही कमी पडलेलो नाही. 

शासनाच्या योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करतानाच जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून मोफत अपघात विमा योजना सुरू केली. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मतदारसंघातील या गावांमध्ये विधायक उपक्रम म्हणून आरोग्य शिबिरे भरवू. मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांचे काम येत्या काही दिवसांत सुरू करू. पंतप्रधान पेयजल योजनेतून 225 कोटी रुपयांच्या मंजूर झालेल्या आराखड्यातून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देऊ.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.