जिल्हा विभाजन - श्रीरामपूर जिल्ह्यासाठी शनि महाराजांना साकडे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा विभाजनानंतर श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे, यासाठी प्रशासनाला साकडे घालूनही अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला. त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने उपाध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी शनि शिंगणापूर येथे जाऊन श्रीशनैश्वराला साकडे घातले.


Loading...
 जिल्हा विभाजनाचा साडेसातीचा फेरा संपू दे, श्रीरामपूर हाच जिल्हा व्हावा, यासाठी शनिदेवाला राजेंद्र लांडगे यांनी साकडे घातले. अनेक वर्षांपासून जिल्हा विभाजनाचा प्रश्न सरकारदरबारी प्रलंबित आहे. श्रीरामपूर हेच मुख्यालय व्हावे, यासाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहेत. 

अनेकदा थेट मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही जिल्हा विभाजनाचे घोंगडे भिजत पडल्याने कृती समितीने आता आंदोलनाची धार अधिक तीव्र केली आहे. राज्य सरकारला दि. १५ ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.