फडणवीस सरकारकडून आरक्षण घेऊ - आमदार स्‍नेहलता कोल्‍हे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तळागाळातील लोकांचे दु:ख कोल्‍हे कुटूंबीय जाणते. सरकारपेक्षा समाजाचं देणं लागतं म्‍हणून शेतकरी संपाला पहिला पाठिंबा मी दिला होता. ज्‍या दिवशी आरक्षण मिळेल, तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहण्यासारखा असेल. आपले लोक सत्तेत असताना आजपयंर्त मिळाले नाही, आता फडणवीस सरकारकडून घेऊ, असा आत्‍मविश्वास कोपरगाव मतदार संघाच्‍या आमदार स्‍नेहलता कोल्‍हे यांनी व्‍यक्‍त केला. 

Loading...
ठिय्या आंदोलनाला पाठींबा आहे. व राहिल. भुमिका समाजविघातक नसावी दंगे, धोपे होवू नये. भुमिका रास्‍त व मागणी रास्‍त, असली तरी त्‍यासाठी तरूणांनी आत्‍मघातकी भुमिका घेऊ नये असे आवाहन ही त्‍यांनी केले. . आमदार स्‍नेहलता कोल्‍हे ९ ऑगस्‍टच्‍या ठिय्या आंदोलनाच्‍या पार्श्वभूमिवर आयोजित मराठा समाजाच्या बैठकीत बोलत होत्‍या. 

प्रशासन आणि न्‍यायालय यात वेळ गेला असला तरी सरकारची भुमिका सकारात्‍मक आहे. सरकारने कायदा आणला, मागासवर्गीय आयोग नेमला, मेगा भरती रोखली, तिकडे न्‍यायालयाने वेळ कमी केली, ही सरकारची भुमिका पाहाता चित्र आशादायी असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.