कोठला स्टँड परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा चिरडून मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील कोठला स्टँड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सोमवारी रात्री आठच्या सुमारात एकाचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीच्या अंगावरून वाहन गेल्याने त्याची उशिरापर्यंत ओळख पटू शकली नव्हती. रस्ता ओलांडत असताना एका पुरुषाला वाहनाने धडक दिली यात वाहनाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 


Loading...
अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरारी झाला. कोठला येथील काही दुकानदारांनी रस्त्यावर पडलेला मृतदेह पाहिला. त्यानंतर तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी आहे. या व्यक्तीचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे. मृताच्या अंगावरील कपडे, चप्पल यावरून ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मागील आठवड्यात याच भागात एका व्यक्तीला वाहनाने चिरडले होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.