मराठा आरक्षणासाठी सरपंचांचा राजीनामा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील रायते गावचे सरपंच ॲड. मच्छिंद्र गजाबा शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा सोमवार दि. ६ ऑगस्ट रोजी राजीनामा दिला आहे.
Loading...

संगमनेर पंचायत समितीच्या सभापती यांच्याकडे ॲड मच्छिंद्र शिंदे यांनी राजीनामापत्र पाठविले असून त्यात म्हटले आहे, की सध्या राज्यभरात मराठा समाजाचे आरक्षणाबाबत मोठ्या स्वरुपात आंदोलन चालू आहे. आंदोलनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, म्हणून मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मराठा समाजास आरक्षण मिळावे, म्हणून सध्याच्या सरकारने व मागील सरकारने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. 


सध्या राज्यात मराठा, धनगर व मुस्लीम समाजास आरक्षण मिळणे गरजेचे आहे; परंतु राज्य सरकार वरील मागण्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ मी रायते येथील ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचा व सरपंचपदाचा राजीनामा देत असल्याचे ॲड. शिंदे यांनी म्हटले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.